पंजाब सरकार तरुणांना स्मार्टफोन वितरित करणार

चंदीगड – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे लवकरच राज्यातील तरुणांना स्मार्टफोन्स वाटणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. स्मार्टफोन्सच्या वितरणासाठी राज्य कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्मार्टफोन्स वाटले जाणार आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना स्व प्रमाणपत्र सरकारला द्यावे लागणार आहे.

राज्याचे डिजिटल सशक्तीकरण अंतर्गत ही योजना राबवली जात आहे. या योजनेमुळे आता लवकरच तरुण विद्यार्थ्यांना स्मार्टफोन्स दिले जातील मात्र हे स्मार्टफोन्स कोणत्या कंपनीचे आणि किती किमतीचे असतील याची माहिती देण्यात आली नाही. स्मार्टफोन्समध्ये विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी दररोज काही प्रमाणात इंटरनेट दिले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबरोबर महिन्याचा 600 मिनिटांचा टॉकटाईम देण्यात येणार आहे. सध्या या स्मार्टफोन्सवर निविदा काढण्याचे काम सुरू आहे. विविध कंपन्यांकडून निविदा मागवण्यात येत आहेत. निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस सरकारने सर्वांना स्मार्टफोन्स देण्याचे आश्वासन दिले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)