‘कृष्णा-भीमा’ स्थिरीकरणाचा अहवाल मागवणार – गडकरी

खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश

अकलूज : कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसंदर्भात केंद्र सरकार राज्य सरकारकडून अहवाल मागवणार असल्याचा निर्णय केंद्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवनमंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांनी त्यांची (दि.3) नवी दिल्ली येथे भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. त्यावेळी गडकरी यांनी अहवाल मागवण्याचे लेखी आदेश काढले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील 6 जिल्हे व 30 तालुक्‍यांसाठी वरदान ठरणारी ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी खासदार मोहिते-पाटील हे बारा वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प राजकीय अनास्थेपोटी रखडला आहे. खासदार मोहिते पाटील यांनी गडकरी यांना पटवून दिले.

महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी चर्चा व्हावी, अशी मागणी मोहिते-पाटील यांनी गडकरी यांच्याकडे केली. तेव्हा राज्य सरकारकडून यासंदर्भातील अहवाल मागवत असल्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. याबाबत लेखी सूचनाही त्यांनी जलसंपदा मंत्रालयाकडे केल्या आहेत. त्यामुळे हा रखडलेला प्रकल्प पूर्ण होण्यासंदर्भातील आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)