प्रभात प्रभाव : रस्त्याच्या कामासाठी घेतलेला टॅब महापालिकेने केला बंद

पुणे- पाणी कपात आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पुणेकरांच्या घशाला कोरड पडलेली आहे. तर, दुसऱ्या बाजूला स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमसमोर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यासाठी चक्क पालिकेच्या जलवाहिनीला “टॅब’ मारून पाणीचोरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याबाबतची बातमी प्रभातने दिली होती.

पुणे – सिमेंट रस्त्यासाठी जलवाहिनी फोडून “पाणीचोरी’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर या बातमीची दखल घेत महापालिकेने स्वारगेट येथील रस्त्याच्या कामासाठी घेतलेला टॅब बंद केला आहे. रस्त्याच्या कामासाठी आता महापालिकेकडून शुध्द केलेले सांडपाणी टँकरने वापरण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्तांनी अवघ्या महिनाभरापूर्वीच लेखी आदेश काढून “सिमेंट रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी वापरले जाणार नाही’ याची तपासणी तसेच खबरदारीचे काम पथ विभागाकडे सोपविले होते . मात्र, पथ विभागाचे “कुंपणच शेत खात’ असल्याचे समोर आले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)