कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर कामाला लागण्याची गरज- प्रियांका गांधी

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील प्रभारी प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्याना तळागाळात आणि बुथ पातळीवर काम करण्याचा आग्रह केला आहे.त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्याकडून चमत्काराची अपेक्षा ठेवू नका, असे सांगितले आहे.

उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी मतदारसंघात जाऊन काम करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच यावर सर्व निकाल अवलंबून असेल, असेही सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गांधी यांनी यावेळी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षातून बाहेर काढण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. मतदारसंघांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याची बैठकीदरम्यान प्रियांका गांधी यांनी चाचपणी केली. तसेच कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनीच पक्षाला मजबूत करण्याची गरज आहे. राज्यात पक्षाला बळ मिळावे यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे, असे यावेळी प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)