बॅंकांमध्ये जनधन खाती उघडण्यात महिला आघाडीवर

नवी दिल्ली – जनधन खात्यासाठी सरकारने अपघात विम्याचे संरक्षण (कव्हर) दुप्पट केल्यामुळे जनधन खात्यांतील ठेव 90 हजार कोटी रुपयांच्या पुढे जाणार आहे. जनधन खात्यांतील जमा रक्‍कम मार्च, 2017 पासून वाढत असून, आता ती रक्कम 89,257.57 कोटी झाली आहे. प्रत्येक घराचे बॅंकेत खाते असावे, या हेतूने प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट, 2014 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेला मिळालेल्या प्रतिसादानंतर सरकारने नंतर जी नवी खाती सुरू केली त्यांच्यासाठी अपघात विम्याचे संरक्षण एक लाखांऐवजी दोन लाख रुपये केले आहे. या खात्यातील ओव्हरड्रॉफ्टची मर्यादाही दुप्पट केली गेली आहे.

प्रत्येक घराचे बॅंक खाते या धोरणाऐवजी सरकारने आता बॅंकेत खाते नसलेल्या प्रत्येक प्रौढाला खाते यावर लक्ष केंद्रित केले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, पीएमजेडीवायअंतर्गत 341.4 दशलक्ष खातेधारक आहेत. या खात्यात सरासरी रक्कम 25 मार्च, 2015 रोजी 1,065 रुपये होती ती आता 2,615 रुपये झाली आहे.

जनधन खात्यांपैकी 53 टक्के खाती ही महिलांची असून, 59 टक्के खाती ग्रामीण भागांतील आहेत. 272.6 दशलक्ष खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड्‌स अपघात विम्याच्या संरक्षणासह दिली गेली आहेत. सरासरी रक्कम 1,065 वरून 2,615 रुपयांवर ताज्या आकडेवारीनुसार पीएमजेडीवायअंतर्गत 341.4 दशलक्ष खातेधारक आहेत. या खात्यात सरासरी रक्कम आता 2,615 रुपये झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)