पोस्टाच्या ठेवीवर आता मिळणार अधिक व्याजदर

नवी दिल्ली – सरकारने पोस्टाकडून चालू करण्यात आलेल्या ठेवीवरील व्याजदरात बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. पोस्टाने सुरू केलेल्या नवीन मुदत बंद लघू सेव्हिंगच्या ठेवीदारांना नवीन योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी सरकार जानेवारी ते मार्च तिमाही दरम्यान देण्यात येणाऱ्या व्याजाची नव्याने घोषणा करणार आहे. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनांवर मिळणाऱ्या व्याजात बदल होणार आहे.

त्यात पीपीएफ (सार्वजनिक भविष्य निधी), सुकन्या समृद्धी योजना, आणि सिनियर सिटिझन सेव्हिंग सवलत योजना यांना मिळणाऱ्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची माहिती वित्त मंत्रालयाकडून 31 डिसेंबरला एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

सरकारने एका वर्षासाठी पोस्ट ऑफिस डिपॉझिट योजनेला मिळणाऱ्या व्याजदरात 0.10 टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. या योजनेवर आता 7 टक्के व्याजदर मिळणार आहे. तो अगोदरच्या तिमाहीत 6.9 टक्‍क्‍यांवर होता. तर तीन वर्षांसाठी मुदत बंद ठेवींवर 7 टक्केदराने व्याज देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तर या योजनेला मागील तिमाहीतील दर 7.2 देण्यात
आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
9 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)