नीती आयोगाचे नावीन्यता वाढीसाठी जोरदार अभियान

नवी दिल्ली – नवे उद्योग वाढून रोजगार वाढावा याकरिता नीती आयोग प्रयत्न करत आहे. नव्या उद्योगासाठी नाविण्यपूर्ण संकल्पनाची गरज असते ही बाब तरुणांच्या मनावर बिंबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून नीती आयोगाच्या अटल नावीन्यता अभियानाद्वारे नई दिशाए, नये निर्माण, नया भारत या अटल टिंकरिंग लॅब पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

युवा दिनाचे औचित्य साधून देशभरात नाविन्यता, कल्पकता जोमाने बहरावी यासाठी पुस्तिका काढण्यात आली आहे.
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी 10 महिन्यांच्या विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अटल टिंकरिंग मॅरेथॉन 2017 मधल्या सर्वोच्च सहा नाविन्यपूर्ण आणि कल्पक उपक्रमांना मूर्त स्वरूप मिळावे आणि हे उत्पादन बाजारात येण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने निधीचं पूर्ण पाठबळ लाभलेला हा विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. अटल टिंकरिंग लॅब पुस्तिकेत, देशाच्या युवा संशोधकांचे अटल टिंकरिंग लॅब समवेतचे अनुभव मांडण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)