‘या’ आठवड्यापासून मोदींच्या सभांचा झंझावात

पंतप्रधान परदेश दौरे टाळून ग्रामीण भागाकडे अधिक लक्ष देणार

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारखा जाहीर होण्याआधीच लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. देशातील 20 राज्यांमध्ये पंतप्रधन नरेंद्र मोदी 100 सभा घेणार आहेत. पाच राज्यांच्या विधनसभा निवडणुकांमधून बोध घेत आता भाजपाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच सभा घेणे निश्चित केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सगळय़ा सभांमध्ये मोदी चार वर्षात त्यांच्या सरकारने केलेली कामे जनतेपुढे ठेवतील. 3 जानेवारीला पंजाबच्या जालंधर आणि गुरुदासपूरमध्ये पंतप्रधानांच्या रॅली आहेत. त्यानंतर सभा होणार आहे, ही मोदीं यांची नव्या वर्षातली पहिलीच सभा आहे. मात्र, याकडे लोकसभेची तयारी म्हणूनच पाहिले जाते आहे.

मोदी यांचे विदेश दौरे गेल्या साडेचार वर्षांत चर्चेत राहिले. मात्र, आता निवडणुकीच्या वर्षात मोदीं विदेशाऐवजी स्वदेश दौऱ्यांना प्राधान्य देणार आहेत. “चलो गॉंव की ओर’चा संकल्प निवडणुकीच्या निमित्ताने घेणारे पंतप्रधान संसद अधिवेशनानंतर देशव्यापी दौऱ्यासाठी निघणार आहेत. नऊ जानेवारीला ते सोलापूरपासून त्याचा प्रारंभ करणार असल्याचे बोलले जाते.

मोदींनी 2014 मध्ये सत्ताप्राप्ती झाल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत किमान 48 विदेश दौरे केले. त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका होते. मात्र, नवे वर्ष निवडणुकीचा सांगावा घेऊन येणारे आहे.

तीन राज्यांत भाजपला सत्ता गमवावी लागल्यावर सावध झालेल्या भाजप नेतृत्वाने जमिनीवर येऊन ठोस काही तरी दाखवायला हवे, हे मनावर घेतले आहे. साहजिकच मोदींनीही निवडणुकीपर्यंत विदेश दौऱ्यांना अल्पविराम देण्याचे ठरविल्याचे दिसते. कारण 2019 च्या पहिल्या चार महिन्यांत मोदींचा एकही विदेश दौरा प्रस्तावित नसल्याचे पीएमओच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. .
तरुणांना आकर्षित करणार

येत्या 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवादिनी भाजपचे एक खास अभियानाचा प्रारंभ होणार आहे. पहला वोट मोदी के नाम असे त्याचे नाव आहे. 2019 मध्ये पहिल्यांदाच मतदार बनणाऱ्या लाखो युवकांनी आयुष्यातील पहिले मत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सशक्‍त नेतृत्वाला द्यावे, यासाठी भाजप देशपातळीवर ही खास मोहीम चालविणार आहे, असे भागपाच्या काही नेत्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)