सर्वांच्या भल्यासाठी समग्र दृष्टिकोन -पियुष गोयल

आरोग्य, घरबांधणी, शेती क्षेत्राला आवश्‍यक प्राधान्य

नवी दिल्ली -अंतरिम अर्थसंकल्पाने सर्व वर्गांच्या कल्याणासाठी एक समग्र दृष्टिकोन स्वीकारला आहे. 100% स्वच्छता, 100% वीज कव्हरेज, सर्वांसाठी आरोग्य सेवा, सर्वांसाठी गृहनिर्माण आणि ग्रामीण क्षेत्राचा विकास करताना त्यांचा आत्मा सचेतन ठेवण्याचे काम या अर्थसंकल्पाने केले आहे, असे हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. अंतरिम अर्थसंकल्प 2019 म्हणजे आमचे सरकार सत्तेत आल्यापासूनच्या चार वर्षाचा विकास आणि कार्य पूर्णत्वाला नेण्याच्या प्रवासाची परिणती होती, असे त्यांनी सांगितले.

मुंबई स्टॉक एक्‍स्चेंज येथे, अर्थसंकल्प पश्‍चात व्यावसायिकांशी झालेल्या चर्चेवेळी अर्थमंत्री म्हणाले की, अंतरिम अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेला शेतकरी पाठिंबा हीं काळाची गरज होती. जीएसटी, पोस्ट डिजिस्टायझेशन आणि इतर सामूहिक प्रयत्नाद्वारे गोळा करण्यात आलेल्या राशीमुळे हे शक्‍य झाले.

अर्थव्यवस्थेच्या औपचारिकरणासाठी, कर आधार वाढविण्यासाठी तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करसंग्रह सुधारण्यासाठी सरकारने हे कर्तव्य पूर्तीच्या भावनेने केले. विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना ही मदत चालू वर्षाच्या 1 डिसेंबरपासून लागू करण्यात आली असून याचा पहिला हप्ता लवकरच देण्यात येईल, असे ते म्हणाले.

असंघटित क्षेत्रामध्ये जवळजवळ 42 कोटी लोक गुंतलेले आहेत, हे सांगताना ते म्हणाले की, सरकार त्यांना भविष्यनिर्वाह निधी अंतर्गत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेद्वारे सरकार मोफत आरोग्य सेवा लोकांना प्रदान करण्यासाठी कार्यरत आहे. ही योजना देशात 50 कोटी लोकांना समाविष्ट करेल. निवृत्तीनंतरचे जीवन आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी निवृत्तीधारक आणि सरकार यांच्या संयुक्‍त योगदानातून निवृत्ती योजना म्हणजेच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना वयाच्या 60 व्या वर्षांपासून चालू होणार असल्याचे मंत्री म्हणाले.

गोयल म्हणाले की, उद्योग आणि वित्तीय क्षेत्रातून आलेल्या सूचनांमुळे सरकारला उद्योग नीती बनविण्यात व मूलभूत बदल करण्यास मदत झाली असून यासाठी त्यांनी उद्योग आणि वित्तीय क्षेत्राच्या योगदानाबद्दल आभार मानले. त्यांनी सरकार आणि उद्योग यांनी एकत्रितपणे गेल्या पाच वर्षांत राष्ट्रासाठी साध्य केलेल्या गोष्टींचा आढावा घेतला आणि भविष्याचा दृष्टिकोन निश्चित केल्याचे सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)