नवी दिल्ली – देशांतर्गत 50 शहरांमध्ये सिटी गॅस आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) केंद्र उभारण्यात येणार आहेत. यासाठी पाईपलाईन बसवण्यात येणार असून आहेत. पेट्रोलियम ऍण्ड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड (पीएनजीआरबी) यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अनुमानातून ही माहिती देण्यात आली आहे.
गॅस बोर्डाकडून शहर गॅस वितरण करण्यासाठी दहाव्या फेरीत 225 बोली लावण्यात आल्या होत्या. या बोलीचे राऊंड नुकतेच समाप्त झालेले आहेत. यातील टेक्निकल विभागातील बोली 7 ते 9 फेब्रुवारीमध्ये खुली होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संबंधित बोली जिंकणाऱ्याला महिन्याच्या शेवटपर्यंत लायसन्स देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पीएनजीआरबीकडून बोलीधारकांची ओळख सांगण्यात आली नाही. बोलीधारकांना परवाना मिळाल्यानंतर मोठा फायदा होणार असून यासाठी जवळपास 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची आवश्यकता भासणार आहे.