वाहनसंख्या वाढली; स्वयंरोजगार वाढणार
नवी दिल्ली – सरकारच्या ऑईल कंपन्यांच्या जवळपास 78500 पंपाची एजन्सी घेण्यासाठी 4 लाख एजन्सीधारकांनी निविदा दाखल केली आहे. यातून मोठ्या प्रमाणात स्वयरोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. हा असा व्यवसाय आहे की यात नियमितपणे पैशाची मोठ्या प्रमाणात उलाढाल करण्यात येते. यातील निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप चालवण्यासाठी इंडियन ऑईलने जाहिरात काढली आहे. तर अन्य कंपन्यांमध्ये कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे.
तेल कंपन्यांनी ज्या ठिकाणासाठी निविदा मागविली होती. त्यातील 95 टक्के ठिकाणासाठीच्या निविदा दाखल झाल्या आहेत. त्यातील 56 टक्के ठिकाणावर अनेक एजंटानी आपली निविदा भरली असून अन्य 39 टक्के पंपासाठी एकच निविदा दाखल करण्यात आली आहे.
आईल कंपन्यांच्या सादर करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये दोन समूहात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकारात जागेसाठी प्रथम बोली लावण्यात येते ती संबंधित एजन्टाने जिंकली तर त्याची निविदा पास करण्यात येते आणि दुसऱ्य़ा बाजूला समूहाचा लकी ड्रॉची पद्धत वापरून संबंधिताची निविदा अंतिम ठरवण्यात येणार आहे.
मोठया प्रमाणात जमीन आणि वित्तीय बाबींशी संबंधित नियमामध्ये सवलत देण्यात आल्यानेच ही स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात 2014-15 मध्ये तेल कंपन्यांनी निविदा मागविल्या होत्या तेव्हा एकूण निविदापैकी 50 टक्केच जागेसाठी निविदा दाखल करण्यात आल्या होत्या.