पेटीएम बॅंकेला ग्राहक स्वीकृतीसाठी मान्यता

मुंबई – पेटीएम पेमेंट्‌स बॅंकेला रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंक व वॉलेट ग्राहकांसाठी केवायसी सुरू ठेवून नवीन ग्राहक स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे. संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बॅंक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकतील.

पेटीएम पेमेंट बॅंकेने वरिष्ठ बॅंकर सतीश गुप्ता यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक केली आहे. 2019 अखेरपर्यंत आणखी 100 दशलक्ष ग्राहक मिळवण्याचे बॅंकेचे ध्येय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुप्ता म्हणाले की, पेटीएम पेमेंट्‌स बॅंक प्रत्येक भारतीयापर्यंत बॅंकिंग सेवा पोहोचविण्याच्या मोहिमेवर आहे. यामुळे अर्थव्यवस्था औपचारिक होण्यास आणि आर्थिक समावेशकता वाढवण्यास मदत होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)