पार्थ पवार तर ‘पोस्टर बॉय’

पिंपरी – राष्ट्रवादीच्या शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील यांनी अजित पवार यांना टार्गेट केले असतानाच मावळ लोकसभा उमेदवारीवरून शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली. पार्थ पवार केवळ “पोस्टर बॉय’ आहे. कोणतेही पवार विरोधात उभे राहिले तरी मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचा मीच उमेदवार असून, विकास कामांच्या जोरावर जनता निवडणुकीत योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील नागरी समस्यांवर महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी खासदार बारणे गुरूवारी (दि. 10) महापालिका मुख्यालयात आले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खासदार बारणे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र अशी पार्थ पवार याची ओळख आहे. मात्र, मावळ लोकसभा मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या जोरावरच मी जनमानसात काम करणारा कार्यकर्ता असून, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलो आहे. या माझ्या ओळखीलाच पवार कुटुंबिय घाबरत आहे. आता लोकसभेच्या तोंडावर अजित पवार शिरूरची चाचपणी करत आहेत, तर त्यांच्या मुलासाठी मावळच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय कोणते तरी एक पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याचे ते म्हणाले.

मावळ लोकसभा उमेदवारीबाबत विचारले असता, बारणे म्हणाले की, खरं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेची उमेदवारी जाहीर करण्याची शिवसेनेची प्रथा आहे. ती पाळली जात आहे. मात्र यापूर्वीच मावळ लोकसभेच्या माझ्या उमेदवारीला “ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. त्यामुळे मावळमधून शिवसेनेचा मीच उमेदवार असणार आहे.

भाजपच्या संपर्कात असल्याच्या वावड्याच

शिवसेना खासदार बारणे हे मावळच्या उमेदवारीसाठी भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, यावर विचारले असता माझे अनेक राजकीय विरोधक शहरात सक्रीय आहेत. माझी शिवसेनेची उमेदवारी मावळातून जड जाईल, या भीतीने ते माजी बदनामी करत आहेत. मावळ लोकसभेची निवडणूक मी केवळ शिवसेनेकडूनच लढविणार आहे. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी राजकीय विरोधकांकडून असल्या वावड्या उठवल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)