कांदा निर्यात वाढविण्यासाठी सवलती

अतिरिक्‍त उत्पादनामुळे कांद्याचे देशभर दर कोसळले

नवी दिल्ली – देशात कांद्याचे उत्पादन मागणीपेक्षा फारच जास्त झाल्यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळून आता हा राजकीय विषय झाला आहे. शेतकरी मंत्र्याना कांदे भेट देत आहेत. त्यामुळे देशातील कांदा कमी व्हावा याकरीता केंद्र सरकार कांद्याची निर्यात वाढविण्यासाठी मोठ्याप्रमाणात प्रयत्न करीत आहे. कांदा निर्यातदारांना आता सवलती दिल्या जात आहे. त्या सवलतीत आणखी वाढ करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की, यासाठी अर्थमंत्रालयाकडे आणखी 179 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत कांदा निर्यातदारांना 5 टक्‍के सवलत दिली जात होती. मात्र कांद्याचे दर आणखीही कमी आहेत. कारण इतर देशातही कांद्याचे दर कमी आहेत. त्यामुळे आता ही सवलत 10 टक्‍के करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थमंत्रालयाला आपण पत्र पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, निर्यातदारांना दिलेल्या सवलती कोणते उत्पादन निर्यात करतात तसेच कोणत्या देशाला निर्यात करतात यावर अवलंबून असतात. सवलती वाढविण्याचे काम वेगात करावे लागणार आहे. कारण कांदा जास्त काळ टिकत नाही. त्यासाठी अर्थमंत्रालयाला तातडीने मदत मागितली असल्याचे त्यांनी सांगितले. विविध राज्यातूनही कांदा लवकर निर्यात केला जावा, अशी मागणी वाढली आहे.

कर्नाटक, गुजजरात, मध्य प्रदेश या राज्यात चांगला पाऊस पडल्यामुळे कांद्याचे उत्पादन वाढले आहे. मात्र इतर राज्यांतून कांद्याला मागणी कमी झाल्यामुळे कांद्याच्या जास्त उत्पादनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे चिंता निर्माण झालेल्या शेतकऱ्यांनी या विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. सध्याही विविध राज्यात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ते कमी करण्याचा प्रयत्न आहे.

“शक्‍य तितका जास्त कांदा निर्यात करून देशातील कांद्याचे दर स्थिर करण्याचा प्रयत्न चालू आहे. कांद्याची निर्यात करणाऱ्यांना यासाठी मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. या सवलतीत आणखी वाढ करण्यासाठी आवश्‍यक निधी अर्थमंत्रालयाकडून उपलब्ध होणार आहे. पंधरवड्यात देशातील कांद्याचे दर योग्य पातळीवर स्थित होतील.                                                                                                                                                                                                                                                                          – सुरेश प्रभू, केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)