…तर नितीन गडकरींना पंतप्रधानपदासाठी शिवसेना पाठिंबा देणार : संजय राऊत

-लोकसभा त्रिशंकू होण्याची शक्‍यता
-शिवसेना स्वबळावर निवडणुका लढण्याची शक्‍यता अधिक

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींचे नाव पुढे आल्यास शिवसेना त्यांना पाठिंबा देईल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही. पुढची लोकसभा त्रिशंकू असेल. अशा परिस्थितीत नितीन गडकरी पुढील सरकारचे नेतृत्व करू शकतात, असे राऊत यांनी म्हटले. याआधीही संजय राऊत यांनी गडकरी पंतप्रधान होऊ शकतात, असे भाकीत केले होते. यानंतर गडकरींनी आपल्याला पंतप्रधान होण्याची इच्छा नसल्याचे म्हटले होते.

पत्रकाशी बोलतांना त्यांनी भाजपासोबत युती करणार नसल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेच्या शब्दकोशात युती हा शब्द नाही, असे राऊत म्हणाले. भाजपा केवळ स्वत:चा विचार करते. त्यामुळे आम्हीदेखील आता फक्त आमचा विचार करतो, असे म्हणत राऊत यांनी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत नेमके काय होईल, याचे भाकीत राऊत यांनी वर्तवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनेनं गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकदा नरेंद्र मोदींच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी राहुल यांनी केली. यावेळी शिवसेनेनेही संयुक्त संसदीय समितीमार्फत राफेल कराराची चौकशी करण्याची मागणी करत भाजपाची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)