गडकरींना उपपंतप्रधान करण्याच्या मागणीला जोर

File photo....

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी मोदी-शहा जोडगोळीच्या कामकाज पद्धतीवर स्पष्ट नाराजी व्यक्त करीत नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान करण्याची सुचना केली आहे. अमित शहा यांना आता केवळ राज्यसभेच्या कामावरच लक्ष केंद्रीत करण्याची सुचना त्यांनी केली असून योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्यांना धार्मिक कार्यासाठी पाठवून द्यावे आणि राजनाथसिंग यांची तेथे नेमणूक करावी असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना एक निवेदन प्रसिद्धीसाठी दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की मोदींचा प्रभाव कमी झाला असून त्यांच्या नावावर आता भाजपला निवडणूक जिंकता येणार नाहीं. ही बाब पक्षाच्या कार्यकर्त्यांनाहीं मान्य आहे. पण उघडपणे बोलण्याचे धाडस कोणीही दाखवत नाही. आज मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्यास काही मोजकी राज्ये वगळता सर्व राज्यांमध्ये भाजपचा पराभव होईल इतकी आज खराब स्थिती आहे असे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)