#NZvIND : अखेरच्या दोन सामन्यांसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा

माऊंट मेंगानुई – भारताविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांत पराभव स्वीकारत मालिका गमावल्यानंतर अखेरच्या दोन सामान्यात न्यूझीलंड संघाने बदल केले आहेत. डग ब्रेसवेल आणि ईश सदी यांच्याऐवजी अष्टपैलू जिमी निशाम आणि टॉड अस्टले यांचा संघात समावेश केला गेला आहे. दुखापत झाल्याने त्यांना संघातील स्थान गमवावे लागले होते पण सध्या ते तंदुरुस्त झाले असून त्यांनी स्थानिक स्पर्धांत खेळून तंदुरुस्ती सिद्ध केली आहे.

न्यूझीलंडचे तळाचे फलंदाज भारताच्या फिरकीपटूसमोर नांगी टाकत आहेत तर आघाडीचे फलंदाजही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट आणि त्याच्या सहकार्यांना भारताच्या फलंदाजांना लवकर बाद करण्यात अपयश येत आहे. या सर्व कारणांमुळे न्यूझीलंड संघात बदल होणेअपेक्षितच होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत बोलताना न्यूझीलंड निवड समितीचे अध्यक्ष गॅविन गार्सीन म्हणाले, आम्ही संघ निवडीत विविधता आणत आमच्या खेळाडुंच्या क्षमतांचा आढावा घेत आहोत. ईश आणि डग यांनी बलाढ्य भारतीय संघाविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जिमी आणि टॉड या मालिकेत काही फरक निर्माण करू शकतात का येऊ आम्हाला पाहायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)