तयार होणाऱ्या घरावरील जीएसटी आज कमी होणार ?

किफायतशीर घरांवर तीन टक्के तर इतर घरांवर पाच टक्केचे प्रयोजन

नवी दिल्ली -तयार होणाऱ्या घरावरील जीएसटीचा दर रविवारी कमी केला जाण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात तत्त्वतः निर्णय या अगोदरच झालेला आहे. तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना जीएसटी कमी करण्याचे सूचित केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या विषयावर गुजरातचे अर्थमंत्री नितीन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीचा अहवाल त्यावेळी उपलब्ध नव्हता. त्यामुळे हा निर्णय काही काळ लांबणीवर पडला होता. या समितीने तयार होणाऱ्या घरावरील जीएसटी कमी करण्याची शिफारस केली आहे. या शिफारसीचा स्वीकार करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी जीएसटी परिषदेची बैठक झाली होती. मात्र, त्यावेळी ही बैठक टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे झाली होती. काही अर्थमंत्र्यांनी या गुंतागुंतीच्या प्रश्‍नावर समोरासमोर चर्चा होण्याची गरज असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर जीएसटी परिषदेची बैठक रविवारी बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत सर्वसाधारण घरावरील जीएसटी इनपुट टॅक्‍स क्रेडिटशिवाय पाच टक्‍के केला जाण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर तयार होणाऱ्या किफायतशीर घरावरील जीएसटी तीन टक्के केला जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे ग्राहक तयार होणाऱ्या घराच्या खरेदीसाठी पुढे येतील. तसे झाले तर त्याचा सरकारलाही फायदा होणार आहे. या घराची विक्री होऊ लागल्यास सरकारला स्टॅंप ड्युटी आणि नोंदणी शुल्क मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)