एक जानेवारीला भारतात 70 हजार बालकांचा जन्म

संयुक्‍त राष्ट्रे – नववर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला जगात भारत हा सर्वाधिक बाळांना जन्म देणारा देश ठरला आहे. युनिसेफने जाहीर केलेल्या आकडीवारीनुसार 1 जानेवारी रोजी भारतात तब्बल 69,944 बाळांचा जन्म झाला आहे. या दिवशी जगभरात जन्माला येणाऱ्या एकूण बालकांच्या तुलनेत हे प्रमाण 18 टक्‍के इतके आहे. त्यामुळे भारताच्या नावावर आगळावेगळा विक्रम नोंदवला आहे.

तसेच भारतापाठोपाठ चीन आणि नायजेरियामध्ये 1 जानेवारीला अनुक्रमे 44,940 आणि 25,685 बाळांचा जन्म झाला आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये 15,112, इंडोनेशियात 13,256, अमेरिकेत 11,086, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये 10,053 आणि बांगलादेशमध्ये 8,248 बाळांचा जन्म झाला आहे.

युनिसेफच्या बालहक्क करार स्वीकाराचा 2019 या वर्षामध्ये तिसावा वर्धापनदिन आहे. या कराराअंतर्गत प्रत्येक मुलाला चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे, असे युनिसेफचे अध्यक्ष डॉ. यास्मीन अली हक यांनी यावेळी सांगितले. जगभरात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी एकूण 3,95,072 बालक जन्माला आले. यांपैकी एकचतुर्थांश मुले ही दक्षिण आशियामध्ये जन्माला आली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)