नमो ऍपवरून भाजपाच्या राज्यात जास्त खरेदी

नवी दिल्ली – नमो ऍपवरून सर्वाधिक खरेदी ही भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधून आणि देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मागील महिन्यापासून पेटीएम आणि ऍमेझॉनसारख्या माध्यमातूनही नमो ब्रॅण्डच्या वस्तू विक्रिसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो ऍपवरून मागील तीन महिन्यांमध्ये 5 कोटींच्या वस्तू विकल्या गेल्या आहेत. यामध्ये टी-शर्टपासून पेनपर्यंत अनेक नमो मर्चंडाइजचा समावेश आहे. 90 दिवसांमध्ये या ऍपवरून 15 लाख 75 हजार वस्तू विकल्या गेल्या आहेत. भाजपाच्या काही खासदारांनी नमो हुडी चॅलेंजच्या नावाने नमो ब्रॅण्डचे हुडी घालून फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीसारख्या नेत्यांनी नमो ब्रॅण्डच्या वस्तू घेण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे.

हिमाचल प्रदेशमधून भाजपाचे खासदार असलेल्या अनुराग ठाकूर आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना नमो अगेनची टीशर्ट घालून ट्‌विटवर फोटो पोस्ट केले आहेत. ही नमो टी-शर्ट नमो ऍपवर 499 रुपयांना उपलब्ध आहेत. एकूण विक्री झालेल्या वस्तूंपैकी 50 टक्के टी-शर्टस आहेत. 17 सप्टेंबर रोजी नमो ब्रॅण्डच्या वस्तुंवर विशेष सेलअंतर्गत सवलत देण्यात आली होती. या काळामध्ये विकल्या गेलेल्या टी-शर्टमधून एकूण 2 कोटी 64 लाखांची कमाई झाली.43 लाखांचे किचैन्स, 37 लाखांचे कॉफी मग आणि 32 लाखांच्या वह्या विकल्या गेल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)