कमलनाथ सरकारही मध्य प्रदेशमध्ये गोशाळा सुरू करणार

भोपाळ – मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार राज्यात 1000 गोशाळा सुरू करणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण राज्यातून सुमारे 1 लाख गायी यामध्ये सुरक्षित ठेवण्यात येतील. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यास अजून 6 महिने बाकी आहेत. यासाठी 450 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष अधिकारी भूपेंद्र गुप्ता यांनी येत्या मे पासून या 1000 गोशाळा सुरू होणार असल्याचे सांगितले.

राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच योजना असल्याचे भूपेंद्र गुप्ता यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यात अशा पद्धतीची कोणतीही सरकारी गोशाळा आतापर्यंत सुरू करण्यात आली नव्हती. 1000 गोशाळेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच ती पूर्ण केली जाईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात 6 लाख गायींच्या सुरक्षिततेची आवश्‍यकता आहे. यासाठी राज्य सरकार त्यांची सुरक्षा लक्षात घेत ही योजना लागू करत आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 614 वैयक्तिक गोशाळांची संख्या वाढवून 600000 केली जाणार आहे.
या गोशाळेत 1,60,000 गायींची सुरक्षा केली जाईल. सध्या सुरक्षेसाठी प्रति गाय 4.50 रुपये खर्च केले जातात. ते वाढवून 20 रूपये प्रति गाय केले जाणार आहे, असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगतिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)