दुखापतींमुळे मार्शच्या अडचणीत वाढ

पर्थ – भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रलियाच्या संघातून वगळण्यात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श यांच्या अडचणीत वाढ झाली असून मांडीच्या दुखापतीमुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघातील स्थान पुन्हा मिळवण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या स्थानिक क्रिकेट मोसमातील पुढील काही सामन्यात खेळू शकणार नाही.

शेफील्ड शिल्ड चषकातील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यू साऊथ वेल्स यांच्यातील सामन्याअगोदरच्या सराव सत्रात नेट्‌समध्ये सराव करताना त्याला दुखापत झाली होती. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे अधिकारी निक जोन्स म्हणाले, मार्शच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यामुळे तो पुढील सामन्यांसाठी उपलब्ध नसणार आहे. त्याच्या तंदुरुस्तीवर बारकाईने लक्ष दिले जाणार असून तो अंतिम आठ फेरीतील सामन्यांसाठी उपलब्ध आहे असेल की नाही याबाबतचे घोषणा नंतर करण्यात येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)