दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दरात कपात

अनुदान योजनेबाबत मुदतवाढीचे आदेश नाही;  गायी म्हशीच्या दुधात 4 रुपये प्रती लीटरने कपात

नगर – दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेची मुदत संपल्याने दूध उत्पादक संघाच्यावतीने उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दुधाच्या दरात कपात करण्यात आली आहे. नवीन दर 11 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. या निर्णयाने गायी व म्हशीच्या दुधाचे दर 4 रुपये प्रती लिटर रुपयांनी कपात केली आहे. यामुळे संघावरील अतिरिक्त बोझा कमी झाला असून याचा ग्राहकांचा कोणताही फायदा होणार नाही.

-Ads-

दूध उत्पादकांना अनुदान देण्यासाठी शासनाच्यावतीने ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या तीन महिने अनुदान योजना राबविण्यात आली. यामध्ये 1 ऑगस्टपासून दूध उत्पादकांना गाईच्या दूधाचा दर 18 रूपयांवरून 25 रूपये अदा करण्याचा निर्णय जिल्हा दूध संघातर्फे घेण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र 22 रुपये दर देण्यात येत होता. या योजनेची मुदत 31 ऑक्‍टोबर रोजी संपली. त्यानंतर योजनेस मुदतवाढ देण्याबाबत कोणतेही आदेश आले नाहीत. 10 नोव्हेंबरपर्यंत वाढीव दर दिल्यानंतर दूध संघाच्यावतीने दर कपातीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाचे दर पूर्ववत 18 रुपये प्रती लिटर करण्यात आले आहेत.

राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. खरीपापाठोपाठ आता रब्बी हंगाम हातातून गेल्याने शेतकऱ्यांना दूध व्यवसाय हा एक उत्पन्न मिळविण्याचे साधन राहिले आहे. त्यात दर कपात झाल्याने शेतकऱ्यांना आधारच राहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असल्याचे सरकार म्हणते ते पाठीत खंजीर खुपसण्यासाठी उभे आहे की काय असे वाटत आहे.
-गुलाबराव डेरे ,दूध उत्पादन शेतकरी संघ

या सोबतच म्हशीच्या दुधाच्या फॅटचे दर प्रती किलो 18 रुपयांनी कमी केले आहे. आतापर्यंत 520 रुपये प्रती किलो फॅट दर दिला जात होता. नवीन दरानुसार 510 रुपये प्रती किलो फॅट दर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे म्हशीच्या दुधाचे दरही 36.50 रुपये प्रती लीटरवरून 4 रुपयांनी कमी होऊन 31.80 रुपये प्रती लीटर भाव दूध उत्पादकांना दिला जाणार आहे.

प्रत्येक संस्थेने दुधाचे पेमेंट सभासदाच्या बॅंक खात्यात वर्ग करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. दूध दरासाठी देण्यात येणारे अनुदान बंद झाल्याने आता पुन्हा दूध उत्पादकांना जुन्या दराने दूधाचे दर मिळणार आहे. त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांना पुरक व्यावसाय म्हणून दूध व्यावसायातून मिळणारा उत्पन्नाला ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्‍त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)