नरेंद्र मोदींना केवळ भाजपची चिंता – मायावती

नवी दिल्ली – केवळ भारतीय जनता पक्षच पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महत्त्वाचा आहे. पण, ते लोककल्याणाच्या मुद्द्यांकडे लक्ष देत नसल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केली आहे. एक वृत्तसंस्थेला पंतप्रधान मोदींनी दिलेल्या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर मायावती यांनी हे वक्तव्य केले आहे.

एक निवेदन बहुजन समाज पक्षाने जारी केले असून त्यांनी यात मोदींनी व्यक्त केलेल्या मतांवर टीका केली. तसेच, मोदी लोकांची आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे, असेही त्यात म्हटले आहे. भाजपने सत्तेत येण्याआधी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तरुणांना रोजगार देणे, गरिबीचे निर्मूलन आणि महागाई कमी करण्यात भाजप सपशेल अपयशी ठरल्याचे बसपने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपची मॉब लिंचिंगबाबत अतिशय चुकीची भूमिका राहिली आहे. राममंदिर मुद्दा आणि गोरक्षा यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली असल्यामुळे जनमानसात नाराजगी पसरली आहे. गोरक्षेसाठी युनिफॉर्म नॅशनल लॉ आणण्याची मागणी मायावती यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)