#Video : मावळमधून लक्ष्मण जगतापांच्या उमेदवारीसाठी एकनाथ पवारांचे प्रयत्न

पिंपरी – युतीबाबत प्रदीर्ध वाद आणि दोन्ही पक्षांकडून स्वबळाचे दंड थोपटून झाल्यानंतर अखेर काल शिवसेना आणि भाजपमध्ये युतीचा निर्णय पक्का झाला. खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला २५ तर शिवसेनेला २३ जागा देण्याचे पक्के झाले आहे.

मात्र नेमक्या कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला येणार हे पक्षनेतृत्वाकडून अद्याप खुले करण्यात आले नसल्याने भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान काल मुख्यमंत्री-शहा-ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर आज पिंपरी येथे लक्ष्मण जगताप समर्थकांनी मावळ मतदार संघ भाजपकडे ठेवण्याची मागणी केली आहे. याबदल भाजपचे नेते एकनाथ पवार यांनी बोलताना सांगितले की , काल भाजप-शिवसेना युती झाली. त्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, मावळमध्ये भाजपाचे प्राबल्य जास्त आहे त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाकडे घेतल्यास निश्चितच या ठिकाणी कमळ फुलू शकते.

त्यानंतर बारणे याबदल विचारले असता एकनाथ पवार म्हटले की, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. भाजपही पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करतोय. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितिन गडकरी यांना विंनती केली आहे. त्यांनी जर आमच्या विनंतीचा सकारत्मक विचार केला तर मावळमध्ये 100 टक्के भाजप विजयी होईल.

मावळमधून लक्ष्मण जगतापांच्या उमेदवारीसाठी एकनाथ पवारांचे प्रयत्न

दरम्यान काल मुख्यमंत्री-शहा-ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर आज पिंपरी येथे लक्ष्मण जगताप समर्थकांनी मावळ मतदार संघ भाजपकडे ठेवण्याची मागणी केली आहे. याबदल भाजपचे नेते एकनाथ पवार यांनी बोलताना सांगितले की , काल भाजप-शिवसेना युती झाली. त्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, मावळमध्ये भाजपाचे प्राबल्य जास्त आहे त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाकडे घेतल्यास निश्चितच या ठिकाणी कमळ फुलू शकते.सविस्तर वाचा…. https://goo.gl/RRAdMb #पिंपरीचिंचवड #मावळ #लोकसभा #मतदार #संघ #भाजप #शिवसेना

Posted by Dainik Prabhat on Tuesday, 19 February 2019

दरम्यान, सध्या मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत. आगामी निवडणूकीत दोन्ही पक्ष या जागेवर आपला हक्क सांगत आहे. कालच्या युतीनंतर ही जागा कोणाकडे राहणार अशी चर्चा रंगली असताना भाजप समर्थकांनी केलेल्या मागणी मुळे मावळ मतदार संघातील वातावरण पुन्हा तापू शकते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)