ममता बॅनर्जीवर गिरीराज यांची टीका

लखनौ – ममता बॅनर्जी यांना त्यांचा पक्ष झाशीची राणी म्हणत असेल मात्र त्या झाशीची राणी नाहीत तर पुतनामावशी आहेत, अशी टीका भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांना झाशीची राणी म्हणणे म्हणजे झाशीच्या राणीला दुषणं देण्यासारखे आहे.

ममता बॅनर्जी पुतनामावशी आहेत, त्या किम जॉंग उनही असू शकतात पण झाशीची राणी नाही, असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. गिरीराज सिंह यांनी केलेल्या टीकेला आता ममता बॅनर्जी काय उत्तर देतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. ममता बॅनर्जी या धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर भाजपाकडून बरीच टीका झाली.

मात्र, त्यावेळी तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हटले होते की ममता बॅनर्जी झाशीची राणी आहेत. याच वक्‍तव्यावर गिरीराज सिंह यांनी टीका केली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जींना पुतनामावशी म्हटलं आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)