मेक इन इंडियामुळे देशांतर्गत उत्पादनाला मिळाली चालना

मुंबई – भारत सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया मोहिमेचे आता सकमारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे देशात गुंतवणूक वाढून रोजगार निर्मिती होऊ लागली असल्याचे निस्सान इंडियाचे प विभाग प्रमुख महेश तिवारी यांनी सांगितले.

ते म्हणाले की, यासाठीच आमच्या कंपनीने संशोधन आणि विकासापासून निर्मितीपर्यंतचे काम भारतात करायचे ठरविले आहे. त्यामुळे भारतातील वातावरणाशी सुसंगत उत्पादने विकसित करण्यास मदत होत असल्याचे ते म्हणाले. अशाच प्रकारे तयार करण्यात आलेल्या निस्सान किकला देशातील ग्राहकांडून पसंती मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. त्याचबरोर कंपनी आगामी काळातही अशी उत्पादने भारतात सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतात या क्षेत्रात कुशल तरुण निर्माण होण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून कंपनीने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाबरोबर सहकार्य करार केला आहे. यामुळे आम्हाला विस्तारकरणासाठी योग्य मनुष्यबळ उबलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. भारतात वाहन निर्मितीबरोबर वाहनांच्या सुट्या भागाची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. त्यासाठी गुंतवणुकीबरोबरच कुशल मनुष्यबळ लागणार असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)