“लघु उद्योजकांसाठी महाटेक हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ’

महाटेक या व्यावसायिक प्रदर्शनाची सुरुवात

पुणे – 15 वे महाटेक- 2019 हे व्यावसायिक प्रदर्शनात 7 ते 10 फेब्रुवारीदरम्यान कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत सुरू आहे. या प्रदर्शनात अत्याधुनिक उत्पादने, यंत्रे व उपकरणे विपणनासाठी आणि विक्रीसाठी प्रदर्शनात उपलब्ध आहेत. यावेळी महापौर मुक्‍ता टिळक, थरमॅक्‍सचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रवीण कर्वे, महाटेकचे संस्थापक काकासाहेब मराठे, विनय मराठे, संचालक (महाराष्ट्र इंडस्ट्री डिरेक्‍टरी) उपस्थित होते.

प्रदर्शनात 300 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून त्याला तीस ते चाळीस हजार उद्योजक भेट देतील असा अंदाज आहे. प्रक्रिया, उपकरणे, इलेकट्रीकल आणि इलेक्‍ट्रॉनिक, मशिनरी आणि मशीन टूल, इन्स्ट्रूमेंटेशन आणि ऑटोमेशन उपकरणे या चार प्रकारामध्ये प्रदर्शनाचे वर्गीकरण करण्यात आली आहे.

प्रवीण कर्वे म्हणाले की लघु उद्योजकासाठी महाटेक हे प्रदर्शन उत्तम व्यासपीठ आहे. विनय मराठे म्हणाले की, महाटेकचे उद्दिष्ट हे उत्पादन क्षेत्राच्या वाढीस प्रोत्साहन देणे असून उद्योजकांना प्रदर्शनासह एसएमईसाठी 4 परिषदाचे आयोजन केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)