महाराष्ट्रात 1000 ड्रीम व्हिलेज निर्माण करण्याची योजना

मुंबई – महाराष्ट्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजीक दृष्टीकोणातून 1000 ड्रीम व्हिलेजेस निर्माण करण्यात येणार आहेत. यात ग्रामीण भागातील आरोग्य व पोषण, शिक्षण, जल व स्वच्छता आणि व्यापक आर्थिक विकास उपक्रमांचा समावेश आहे.
या उपक्रमांतर्गत, स्वतःचीच आयुष्ये क्रांतिकारी पद्धतीने बदलण्यासाठी या समाजगटांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रीम व्हिलेज जगासमोर आणण्यात येणार असून पर्यावरण व सामाजिकदृष्ट्या हा उपक्रम अत्यंत सजग असणार आहे. शहरी भागात राहणाऱ्या कुटुंबांना मूळ गावांकडे आकर्षून घेण्याचा कार्यक्रम प्रकल्पांतर्गत राबवण्यात येणार आहे. इतरांसाठी शाश्वत विकासाचा नवा आराखडा मांडणे, हे या प्रकल्पामागील मूळ उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रातील 1000 ड्रीम व्हिलेजेसमधील विकासकामांना चालना देण्यासाठी स्वदेस फाऊंडेशन या संस्थेने महाराष्ट्र सरकारबरोबर करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वदेस फाऊंडेशन ही संस्था महाराष्ट्रातील 100 गावांचे सबलीकरण करण्यासाठी पुढे आली आहे.

कामाचा परिणाम साधण्यासाठी अशा भागीदारी उपयुक्त ठरतात. स्वदेस फाऊंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांचे आयुष्य बदणाऱी परिसंस्था तयार करणे, या परिसंस्थेतून आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे जीवनशैलीचा विकास साधण्यासाठी या समाजगटांना मदत करणे हे आमचे ध्येय आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)