महाराष्ट्र बॅंकेकडून व्याजदरात कपात

पुणे -रिझर्व्ह बॅंकेने अनपेक्षितपणे रेपो दरात पाव टक्‍क्‍यांपर्यंत कपात केल्यानंतर इतर बॅंकांनीही कर्जावरील व्याजदरात लवकर कपात करावी, असा आग्रह उद्योजकांकडून होत असतानाच महाराष्ट्र बॅंकेने काही तासातच कर्जावरील व्याजदरात म्हणजे एमसीएलआरमध्ये घट केली आहे.

आता बॅंकेचा एमसीएलआर ओव्हर नाईटसाठी 8.20 टक्के, महिन्यासाठी 8.30 टक्के, 3 महिन्यांसाठी 8.50 टक्के, सहा महिन्यासाठी 8.55 टक्के तर 1 वर्षासाठीचा एमसीएलआर 8.75 टक्के असेल.

बॅंकेने बेस व्याजदरात बदल केलेला नाही. नवीन व्याजदर 7 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले असल्याचे बॅंकेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)