महाराष्ट्र बॅंकेच्या कार्यान्वयन नफ्यात वाढ

खराब कर्जासाठीच्या तरतुदीमुळे ताळेबंदावर दबाव कायम

पुणे  – बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांनी आर्थिक वर्ष 2018-19 च्या तिसऱ्या तिमाही अखेरचे (नऊमाही) आर्थिक निकाल जाहीर केले. यावेळी कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक हेमन्त टम्टा उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजीव म्हणाले की, सर्वांगीण आर्थिक कामगिरी सुधारण्यासाठी बॅंक सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बॅंकेची कामगिरी अधिक गुणवत्तापूर्ण होण्यासाठी संरचनात्मक बदल बॅंक करत आहे.
कार्यक्षमतेमध्ये सुधार, कृषी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) तसेच किरकोळ (रिटेल) कर्जामध्ये वृद्धी

याबरोबरच ग्राहक आणि भागधारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढण्यावर बॅंकेने आपले लक्ष केंद्रित केले आहे. 31 डिसेंबर 2018 अखेरीस नऊ महिन्यांचा कार्यान्वयन नफा वाढला असून दि. 31 डिसेंबर 2017 या गतवर्षाच्या रुपये 419.36 च्या तुलनेत तो 31 डिसेंबर 2018 रोजी रुपये 431.85 कोटी इतका झाला आहे. बॅंकेचा कार्यान्वयन नफा 31.12.2017 रोजी समाप्त नऊ महिन्यांच्या अवधीसाठी रुपये 1644.67 कोटींच्या तुलनेमध्ये 31.12.2018 रोजी समाप्त नऊ महिन्यांच्या अवधीसाठी वाढून रुपये 1696.51 कोटी झाला आहे.

31 डिसेंबर 2018 या नऊमाही अखेरीस बॅंकेचा निव्वळ तोटा गतवर्षीच्या 31 डिसेंबर 2017 च्या रुपये 27 कोटी नफ्याच्या तुलनेत 31 डिसेंबर 2018 रोजी रुपये 3764 इतका झाला आहे. हा वाढीव तोटा मोठ्या खराब कर्जाच्या मालमत्ताच्या पोटी करण्यात आलेल्या जादा तरतुदीमुळे आणि वेतनवृद्धीबाबतच्या रु 82.12 कोटींच्या तरतुदी केल्यामुळे झालेला आहे. बॅंकेचा एकूण व्यवसाय 31 डिसेंबर 2018 रोजी रु. 2,25,596 कोटी इतका झाला आहे, असे त्यानी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)