आयुर्विम्याविषयी 30 टक्‍के लोक अनभिज्ञ

तब्बल 72 टक्‍के लोकांनी इच्छापत्र केलेले नाही

मुंबई – जीवनातील प्रमुख उद्दिष्टांचे नियोजन करण्यासाठी लाईफ इन्शुरन्स हे भारतीयांचे प्रामुख्याचे आर्थिक साधन असले, तरी 30 टक्के भारतीयांना लाईफ इन्शुरन्सबाबत आवश्‍यक माहिती नसल्याचे दिसून आले आहे. एक्‍साइड लाईफ इन्शुरन्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतीयात आर्थिक साक्षरतेचा अजूनही बराच अभाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महानगरे व टिअर 2 शहरे अशा एकूण 12 शहरांतील व्यक्तींनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. लाईफ इन्शुरन्स इच्छुक, त्यांचे पैसे हाताळण्याकडे कसे पाहतात, हे समजून घेण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 66 टक्के लोक त्यांच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसी बॉंडची भौतिक स्वरूपातील प्रत जपून ठेवतात, तर केवळ 8 टक्के जणांनी त्यांच्या योजना ई-इन्शुरन्स खात्याशी लिंक केल्याची माहिती आहे.

तब्बल 72 जणांनी इच्छापत्र केलेले नाही. इच्छापत्राचे महत्त्व माहीत असूनही हे चित्र दिसून आले. तर 45 वर्षे व त्याहून अधिक या वयोगटातही इच्छापत्र तयार करण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे पाहणीवेळी समोर आले आहे.

एक्‍साइड लाइफ इन्शुरन्सनचे संचालक मोहित गोयल म्हणाले, आर्थिक सर्वेक्षण 2018 नुसार अन्य विकसित देशांच्या तुलनेत भारतात लाईक इन्शुरन्सचे प्रमाण सध्या 3 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. सर्वेक्षण केलेल्या 30 टक्के भारतीयांच्या बाबतीत वैयक्तिक इन्शुरन्स कव्हर अजूनही अनिश्‍चित आहे.

सरकारने व विमा उद्योगाने आर्थिक साक्षरता वाढवण्यावर भर दिला असूनही, लोकांना स्वतःसाठी व कुटुंबासाठी किती विमा संरक्षण आहे, हे ठरवणे आव्हानात्मक वाटते. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 46 टक्के भारतीयांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा किमान 10 पट अधिक कव्हर असावे, असे वाटते. परंतु केवळ 29 टक्के व्यक्तींकडेच ते असल्याचे दिसते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)