हेमंत भार्गव यांच्याकडे एलआयसी अध्यक्षपदाचा कार्यभार

नवी दिल्ली – जीवन विमा निगमच्या (एलआयसी) अध्यक्षपदाचा अतिरिक भार हेमंत भार्गव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. भार्गव हे एलआयसीचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक आहेत. पूर्व अध्यक्ष व्ही. के. शर्मा हे सेवानिवृत्त झाल्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी भार्गव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, सरकारने आधीपासूनच एलआयसीच्या पूर्ण वेळ अध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया सुरू केली आहे.

भार्गव यांना फेब्रुवारी 2017 मध्ये एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्‍त करण्यात आले होते. एलआयसीमध्ये भार्गव यांच्या व्यतिरिक्‍त अजून दोन व्यवस्थापकीय संचालक आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भार्गव यांनी विविध क्षेत्रांचेही नेतृत्व केले आहे, यामध्ये उत्तर विभागामध्ये समाविष्ट दिल्ली, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मीर, हरियाणा राज्य आणि चंदिगडचे केंद्रशासित प्रदेश तसेच पूर्व विभागामध्ये समाविष्ट अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल राज्य, अंदमानचा केंद्रशासित प्रदेश आणि निकोबार बेट आदींचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)