लसिथ मालिंगा आगामी दोन सामने खेळणार

मुंबई  – पहिल्या सामन्यात गोलंदाजांच्या खराब कामगिरी मुळे पराभवाचा सामना करावा लागलेल्या मुंबई इंडियन्सला दुसऱ्या सामन्या पुर्वी गूड न्युज मिळाले असून पहिल्या सहा सामन्यांसाठी उपलब्ध नसलेल्या मालिंगाला आगामी दोन सामन्यांसाठी खेळण्याची परवानगी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला धक्का बसला होता. जलद आणि अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाला राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशी परतावे लागले होते. त्यामुळे 24 मार्चला झालेल्या मुंबईची पहिल्या लढतीत मलिंगाची जादू पाहायला मिळाली नाही. मात्र आता पुढील दोन सामन्यात त्याची जादू पाहायला मिळणार आहे.

देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धेत खेळावे लागणार असल्याने मलिंगाला सहा सामन्यांना मुकावे लागणार होते. मात्र, बीसीसीआयच्या मध्यस्थीनंतर मलिंगाला दोन सामने खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू (28 मार्च) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (30 मार्च) यांच्याविरुद्धच्या सामन्यासाठी मलिंगा उपलब्ध असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)