नितीशकुमार यांच्या टीकेला लालूप्रसादांचे प्रत्युत्तर

पाटणा – बिहारमधील महाआघाडीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी टिका केल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना सडेत्तोड उत्तर दिले आहे. नितीश यांनी त्यांना निवडून दिलेल्या जनतेचा विश्वास घात केला आहे. तरीही ते आपल्या कृतीचे समर्थन करीत असल्याचे लालू म्हणाले.

ते म्हणाले की, नितीश जे पद भूषवत आहेत, ते त्यांना महाआघाडीमुळेच मिळाले आहे. नितीश यांनी जनतेच्या आदेशावरच दरोडा टाकला असून कोट्यवधी बिहारींच्या निर्णयाचा अपमान केला आहे.

लालूप्रसाद यादव हे बिहारमधील चारा घोटाळाप्रकरणी सध्या शिक्षा भोगत आहेत. लालूंच्या अधिकृत ट्‌विटर हॅंडलवरून असे ट्‌विट करण्यात आले.राज्यात राजद, कॉंग्रेस, रालोसप, हम यांच्यात आघाडीबद्दल चर्चा सुरू आहे. तर भाजप, संजद आणि लोजपने एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)