… तर चहलची कमतरता जाणवते – कुलदीप यादव

नेपिअर – दुसऱ्या बाजूने गोलंदाजी जोडीदार म्हणून जर युझुवेंद्र चहल नसेल तर त्याची कमतरता जाणवते असे विधान चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने केले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केल्यावर बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तो असे म्हणाला आहे.

नेपिअर येथे झालेल्या सामन्यात युझुवेंद्र चहलने स्वतःच्या सुरुवातीच्या काही षटकात न्यूझीलंडचे आघाडीचे दोन बळी घेतले होते तर कुलदीपने कर्णधार केन विलियम्सनला बाद केल्यावर त्यांचे शेपूट गुंडाळत चार बळी मिळवले. त्यामुळे न्यूझीलंड संघ सर्वबाद 157 पर्यंतच मजल मारू शकला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुलाखतीत बोलताना कुलदीप म्हणाला, जेव्हा चहल माझ्यासह दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करत नसतो त्यावेळी मला अनेक बाबींना मुकावे लागेल. खेळपट्टींचे स्वरूप पाहून कशी गोलंदाजी करायला हवी हे आम्ही समजतो. दोघांची गोलंदाजीची शैली वेगळी असली तरी त्यातील बलस्थाने आणि कच्चे दुवे आम्ही चांगले ओळखतो. जास्तीत जास्त वेळा अगोदर गोलंदाजी करण्याची चहलला संधी मिळते आणि मी नंतर गोलंदाजी करतो. त्यामुळे खेळपट्टी कशी आहे आणि फलंदाज कशाप्रकारे खेळी साकारत आहे, याबाबतीत अनुभव सांगून तो मला काय करायला पाहिजे हे देखील सांगतो.

जेणेकरून, माझी गोलंदाजी अणखी भेदक होते. आम्ही दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खूप बळी घेतले होते तर भारतात देखील चांगली कामगिरी केली होती. आता न्यूझीलंड दौऱ्यातही जास्तीत जास्त बळी घेण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही तो म्हणाला.

नेपिअरमधील खेळपट्टी ही सपाट स्वरूपाची आणि फलंदाजीस मदत करणारी होती. तरीदेखील भारतीय फिरकी जोडीने कमाल करत सहा बळी मिळवले. याबाबत बोलताना कुलदीप म्हणाला, येथील खेळपट्टी ही फलंदाजीला मदत करणारी होती. चेंडू फारसा वळत ही नव्हता. त्यामुळे आम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत फलंदाजावर दडपण आणायचे होते. आम्ही असे करण्यात यशस्वी झालो आणि दोघांनीही बळी मिळवले.

पुढील विश्‍वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ तयारी करत असून एकदिवसीय सामन्यात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्‍विन यांचे स्थान अढळ नाही. कोणताही संघ बोटांनी चेंडू वळवणाऱ्या फिरकीपटूंपेक्षा मनगटाच्या आधारे चेंडू वळवणाऱ्या फिरकीपटूंना जास्त प्राधान्य देतो. त्यातच दोघांची कामगिरीही उत्तम होत असल्याने याचा जोडीला विश्‍वचषकाच्या संघात स्थान मिळण्याची जास्त शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)