कुंभमेळ्यात 15 कोटी भाविक येणार

कुंभमेळ्यात पर्यावरण संतुलनाकडे संयोजकांचे लक्ष

प्रयागराज – कुंभमेळ्यात सुमारे 15 कोटी भाविक सामील होण्याची अपेक्षा आहे. कुंभमेळ्याचे क्षेत्र 1600 चौरस हेक्‍टरवरून वाढवत 3200 चौरस हेक्‍टर करण्यात आले आहेत. पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने येथे गायीच्या शेणाने इंधन आणि डासांच्या निर्मूलनासाठी विशेष अगरबत्ती तयार केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमक्षेत्रात 14 जानेवारी ते 4 मार्चपर्यंत कुंभमेळा आयोजित होणार आहे. कुंभमेळा पसिरात वीज पुरवठ्याकरता उत्तर प्रदेशचे सरकार 226 कोटी रुपये खर्च करणार आहे. येथे टाकण्यात आलेल्या वीजतारांची लांबीच 1080 किलोमीटर इतकी आहे. कुंभक्षेत्रात 48 दिवसांपर्यंत (15 जानेवारी ते 4 मार्चपर्यंत) 24 तास वीजपुरवठा केला जाणार आहे. कल्पवासींना (कुंभ मेळय़ात संगम तटावर राहणारे भाविक) मोफत जोडणी दिली जाणार आहे.

कुंभमेळ्यात दोन महिन्यांमध्ये होणाऱ्या विजेच्या वापराद्वारे पूर्ण उत्तर प्रदेश एक दिवस उजळविले जाऊ शकते. राज्यात हिवाळय़ात विजेचा वापर प्रतिदिन 15 हजार मेगावॅट आणि उन्हाळ्यात 20 हजार मेगावॅटवर पोहोचतो. 226 कोटींच्या वीजपुरवठ्यात 125 कोटी रुपयांची वीज पूर्वांचल विद्युत मंडळ उपलब्ध करणार आहे.

24 तास वीज पुरवठ्याकरता पूर्ण कुंभक्षेत्रात 64 वीज केंद्रे स्थापन केली जात आहेत. कुंभक्षेत्रात 42 हजार 700 एलईडी लाइट्‌स मेळाक्षेत्रात तर 42 हजार स्ट्रीट लाईट्‌स मार्गांवर बसविले जात आहेत. विविध क्षमतांचे 163 ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. सध्या कुंभक्षेत्रात 10 ते 12 मेगावॅट विजेचा वापर एका दिवसात होतोय. परंतु 12 जानेवारीनंतर हा आकडा तीनपट वाढणार आहे. तेव्हा दरदिनी 30 ते 32 मेगावॅट विजेचा वापर होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)