‘खेलो इंडिया’ युथ गेम्सच्या ऍपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

9 ते 20 जानेवारी दरम्यान स्पर्धा पुण्यात रंगणार

पुणे  – केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे मंत्रालयात खेलो इंडिया ऍप, स्पर्धेसाठी खास बनविण्यात आलेल्या टीव्हीसी (चित्रफीत) आणि जिंगलचे अनावरण करण्यात आले. दिनांक 9 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी येथे 18 क्रीडाप्रकारात ही स्पर्धा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धेत 17 व 21 वषार्खालील मुले व मुली या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. संपूर्ण देशामधून भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू/संघ तसेच राष्ट्रीय क्रीडा संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील संघ/खेळाडू, सी.बी.एस.सी. राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू तसेच स्पर्धा आयोजक राज्याने निवड केलेले खेळाडू असे सुमारे 12 हजार 500 खेळाडू, तांत्रिक अधिकारी व स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

खेलो इंडिया युथ गेम्स 2019 मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना, प्रेक्षकांना या स्पर्धेबाबत घरबसल्या आपल्या हातातील मोबाईलमध्ये पूर्ण माहिती मिळावी, यासाठी हे मोबाईल ऍप तयार करण्यात आले आहे.या ऍपमध्ये खेलो इंडिया युथ गेम्सची पूर्ण माहिती असून खेळाचे संपूर्ण वेळापत्रक आहे. तसेच महत्वाचे संपर्क, वाहतूक व्यवस्था याबाबतची माहिती यामध्ये उपलब्ध असून पुणे शहर आणि आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ऍपवर स्पर्धेची पदतालिका दररोज उपलब्ध होणार आहे.

अनावरणप्रसंगी राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे, आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार राजेंद्र पटनी, मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उपसचिव राजेंद्र पवार, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, मुंबई विभागाचे उपसंचालक नागा मोटे, क्रीडा मंत्र्यांचे स्वीय सचिव श्रीपाद ढेकणे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी खेलो इंडियाच्या महाराष्ट्र संघास शुभेच्छा दिल्या.

गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी खेलो इंडिया उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. खेलो इंडिया स्पर्धा दिनांक 9 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथे होणार आहेत. तिरंदाजी, ऍथलेटिक्‍स, बॅडमिंटन, बॉक्‍सिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्‍स, ज्युडो, नेमबाजी, जलतरण, टेबलटेनिस, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल अशा खेळांमध्ये विविध खेळाडू सहभागी होणार आहेत.

खेलो इंडियाचे फेसबुक पेज, चित्रफित आणि जिंगल – खेलो इंडिया युथ गेम्सची सर्व माहिती आणि अपडेटस मिळावेत याकरिता फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे.  खेलो इंडिया युथ गेम्सच्या प्रसिध्दीसाठी आणि खेळाडूमध्ये उत्साह वाढविण्याच्या दृष्टीने जिंगल तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध स्पर्धेचे पदक विजेते खेळाडूवर चित्रफित तयार करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)