छत्तीसगढमध्ये निरक्षर मंत्री

रायपूर – छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 9 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यात आयुष्यात एकदाही शाळेत न गेलेले 65 वर्षीय कवासी लकमा थेट मंत्री झाले.

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातल्या नागारास या गावामध्ये 1953 साली लकमा यांचा जन्म झाला. सुकमामधील हा भाग अतिशय दुर्गम आणि मागासलेला आहे. त्यामुळेच गरिबीमुळे दैनंदिन जगण्याच्या धडपडीमुळे येथील अनेक मुलांना शाळेत जाता येत नाही. शिक्षणाचा अभाव असलेल्या भागातच बालपण गेल्याने लकमा कधी शाळेत गेलेच नाहीत. त्यामुळे त्यांना लिहीता वाचता येत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, शिक्षणाचा अभाव असतानाही आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर लकमांनी स्वत:ला समाजकार्यात वाहून घेतले. ते मागील अनेक दशकांपासून समाजकार्य करत आहेत. बस्तर जिल्ह्यातील कोंटा मतदारसंघातून ते मागील 20 वर्षांपासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. इतकेच नाही तर त्यांनी विधानसभेत कॉंग्रेसचे उपनेते म्हणूनही काम केले आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या नक्षली हल्ल्यांमधून ते थोडक्‍यात बचावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)