भारताकडून ज्युनियर आशियाई कुस्ती स्पर्धेचे यजमानपद काढले

नवी दिल्ली- भारत-पाकिस्तान यांच्यातील टोकाला गेलेल्या राजकीय संघर्षाचा फटका भारतीय कुस्तीला बसला आहे. जुलैमध्ये रंगणाऱ्या ज्युनियर आशियाई कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेचे यजमान भारताकडून काढून घेण्याचा निर्णय जागतिक कुस्ती संघटनने रविवारी घेतला.

त्याआधीच या संघटनेने आपल्याशी संलग्न संस्थांना फर्मान सोडले होते की, त्यांनी भारतीय कुस्ती फेडरेशनशी कोणतेच संबंध किंवा व्यवहार ठेवू नये. भारताने नवी दिल्लीत पार पडलेल्या नेमबाजी वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या नेमबाजांना व्हिसा नाकारला. ज्याची निंदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडूनही करण्यात आली होती. यानंतरच हा निर्णय घेण्याचे ठरवले गेले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)