#CWC2019 : बेयरस्टोला धास्ती भारतीय चाहत्यांची

बर्मिंगहॅम – विजेतेपदाचा दावेदार असलेला भारतीय संघ ऑरेंज जर्सीमध्ये आजचा सामना खेळणार आहे. या सामन्यात इंग्लंडला पराभूत करीत उपांत्य फेरी गाठण्याचे वेध भारताला लागले असून बाद फेरीसाठी उत्सुक असलेल्या इंग्लंडलाही या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. दोन्ही संघांच्या चाहत्यांसाठी “सुपरसंडे” साजरा करण्याची योग्य संधी आहे.

क्रिकेट हा भारतीय लोकांसाठी ह्रदयस्थानी असतो असे नेहमीच म्हटले जाते. येथेही भारतीय चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यातच आज रविवार असल्यामुळे सुट्टीचा आनंद या सामन्याद्वारे घेण्यासाठी भारतीय चाहते उत्सुक आहेत. बेयरस्टो याला या चाहत्यांची भीती वाटत आहे.

तो म्हणाला, या सामन्यात आम्हास विजय मिळावा अशी त्यांची बिलकुल इच्छा नसणार. साहजिकच त्यांचेच आमच्यावर दडपण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)