आयटी उद्योगाने कात टाकली

हैदराबाद – देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र मरगळ झटकून पुन्हा प्रगतीपथावर परतत असल्याचे स्पष्टपणे दिसत असून, आयटी सेवा क्षेत्रासह नवउद्यमी क्षेत्रात आगामी वर्षांत म्हणजे 2019 मध्ये नवपदवीधरांच्या भरतीला गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

माहिती-तंत्रज्ञान उद्योगात सुरुवातीचे वेतनमान हे गेल्या सात वर्षे आहे त्या पातळीवर स्थिर होते, 2018 मध्ये त्यात पहिल्यांदाच 20 टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली. 2019 सालात हा वाढीचा क्रम सुरू राहिल्याचे दिसून येईल. एकूण तंत्रज्ञानाधारित सेवा उद्योगात पाच लाखांच्या घरात नवीन भरती होण्याचा आशादायी कयास इन्फोसिस टेक्‍नॉलॉजीजचे माजी वित्तीय अधिकारी मोहनदास पै यांनी व्यक्त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तथापि अमेरिकेत एच1बी व्हिसासंबंधी परिस्थिती आणखी प्रतिकूल बनताना दिसेल. मात्र भारतीय कंपन्यांनी पर्याय म्हणून जपान आणि अन्य दक्षिण आशियाई बाजारपेठेकडे मार्चा वळविला असल्याचे त्यांनी सांगितले. बड्या कंपन्यांकडून व्यापक विस्तारीकरण आणि समभागांची आकर्षक किमतीत पुनर्खरेदी दृष्टिपथात असल्याचे भागधारकांसाठीही आगामी काळ फलदायी ठरणार आहे.

देशात सध्या नवउद्यमी संस्कृती जोम धरत असून, वेगवेगळ्या स्टार्ट-अप्समध्ये सुमारे 6,00,000 कर्मचारी कार्यरत आहेत. 2018 सालात त्यापैकी 1,50,000 कर्मचारी सामावून घेतले गेले, तर आगामी 2019 सालात आणखी 2,00,000 लोकांना उमद्या वेतनमानाची रोजगार संधी या क्षेत्रातून येईल.

माहिती-तंत्रज्ञान सेवा उद्योगातूनही आणखी अडीच ते तीन लाखांची नोकरभरती अपेक्षित असल्याचे पै यांनी सांगितले. देशात सध्या 39,000 स्टार्टअप्स कार्यरत आहेत, दरसाल नवीन 5,000 स्टार्टअप्सची त्यात भर पडत आहे, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)