#IPL2019 : दिल्ली संघासाठी खरी कसोटी

दिल्ली  -ऋषभ पंतच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दिल्ली कपिटल्स संघाने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्ससारख्या बलाढ्य संघाला नमविले. त्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास वाढलेला होता; परंतु, दुसऱ्या सामन्यात त्यांना चेन्नई विरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे पहिले दोन्ही सामने जिंकून गुणतक्‍त्यात पहिल्या स्थानी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या अनुभवी खेळाडूंपुढे दिल्लीचे नव्या दमाचे खेळाडू कितपत यशस्वी ठरतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कोलकाता संघाने पहिल्या सामन्यात गतवेळचे उपविजेते सनरायजर्स हेदराबादचा पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात त्याने किंग्स इलेव्हन संघाला आरामात पराभूत केले. त्यामुळे कोलकाता संघ सध्या मजबूत भासतो आहे; परंतु दोन्ही सामन्यात गोलंदाजाना चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. आंद्रे रसेल आणि पियुष चावला वगळता अन्य गोलंदाज फिके दिसत आहेत. चायनामन कुलदीप यादवला अजूनही यश मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची गोलंदाजी पुरती निष्प्रभ भासते आहे.

फलंदाजीमध्ये नितेश राणा, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसेल याने दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी करत धावा जमविल्या आहेत. नितेश राणाने सलग दोन सामन्यात अर्धशतके झळकावत या मोसमात सर्वाधिक 131 धावा करत ऑरेंज कॅप पटकाविली आहे. त्यातच रसेलने दोन्ही सामन्यात 45 पेक्षा जास्त धावा बनविल्या आहेत. त्यामुळे शुभमन गिल आणि सुनील नारायण यांनी संधी मिळाल्यास आपली उपयुक्तता सिद्ध केले आहे.

दिल्ली कपिटल्स संघात प्रतिभावान नवोदित भारतीय खेळाडूंचा भरणा आहे. पृथ्वी शॉ, श्रेयश अय्यर, ऋषभ पंत यांच्या साथीला अनुभवी शिखर धवन असल्याने यांचे फालंदाजी मजबूत आहे. मागील सामन्यात पंतने 27 चेंडूत 78 धावांची खेळी करत विरोधे संघांना धोक्‍याचा इशारा दिला आहे. त्या खेळीत त्याने 7 चौकार आणि 7 षटकार लगावले होते. गोलंदाजी विभागातही हा संघ समतोल आहे. ट्रेंट बोल्ट आणि कागिसो रबाडा सारखे जागतिक दर्जाचे परकीय जलदगती गोलंदाजासह इशांत शर्मा आणि अक्षर पटेलही या संघात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)