#IPL2019 : मुंबई-पंजाबमध्ये कोण मारणार बाजी

File photo

-दोन्ही संघांचे प्रत्येकी एक विजय एक पराभव
-ख्रिस गेलच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा
-पंचांच्या कमगिरीकडेही लक्ष

मोहाली -बंगळूरूविरुद्ध अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गोलंदाजीच्या बळावर सामना जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स समोर किंग्स इलेव्हन पंजाबला त्यांच्याच मैदानावर पराभूत करण्याचे आव्हान आहे. मागील सामन्यात मुंबई इंडियन संघाने रॉयल चॅलेंजर्स संघाला नमविले असले तरी पंजाबला नामविणेही कठीण काम आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा परभव विसरून पुन्हा विजयी मार्गावर पोहचण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाब प्रयत्न करेल. दोन्ही सामन्यात पचांच्या निर्णायामुळे वाद झाले असले तरी त्याचा परिणाम पंजाबच्या कामगिरीवर होण्याचे संकेत नाहीत.

किंग्ज इलेव्हन पंजाब मुंबई इंडीयन्स

वेळ – दु. 4.00 वा.
स्थळ -आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या काही षटकांत जास्त धावा देणे पंजाबला महागात पडला होते. त्याच कारणामुळे त्यांनी तो सामना गमावला आणि गुणतक्‍त्यात पहिल्या स्थानी जाण्याची संधीही गमवाली होती. पंजाब संघाच्या फलंदाजीची संपूर्ण मदार त्यांचे सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांच्यावर आहे. मागील सामन्यात त्यांना पावर प्लेमध्ये जास्त धावा जमविता आल्या नव्हत्या. त्यातच त्यांनी चुकीचे फटके खेळल्याने त्यांना बाद व्ह्यावे लागले होते. या सामन्यात त्यांच्याकडून फलंदाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अखेरच्या षटकांत डेव्हिड मिलर आक्रमक खेळी करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे पंजाबच्या फलंदाजीस बळकटी मिळते.

दिल्ली कॅपीटल्स कोलकता नाईट रायडर्स

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ -फिरोजशहा कोटला, दिल्ली

गोलंदाजीची धुरा कर्णधार आर. अश्‍विन, मोहम्मद शमी यांच्याकडे आहे. त्याचबरोबर सॅम करन आणि वरुण चक्रवर्थी यांच्याकडूनही अपेक्षा आहेत. विक्रमी रक्‍कम मोजून संघात सामील केलेला फिरकीपटू वरुणला पदार्पणाच्या सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती.

मुंबई इंडियन्सने या मोसमातील पहिला विजय मिळवला असला तरी हा सामना जिंकून गुणतक्‍त्यात आघाडीच्या तीन क्रमांकावर झेप घेण्याचे त्यांचे ध्येय आहे. मागील सामन्यात रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु, मधलीफळी कोलमडल्याने त्यांना दोनशे धावांचा टप्पा पार करता आला नाही. मागील सामन्यात जसप्रीत बुमराहसह मुंबईच्या जलदगती गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजयश्री खेचून आणला होता. त्यामुळे या सामन्यात गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. बुमराहने अखेरच्या दोन षटकांत मोजक्‍याच धावा देत मुंबईला सामना जिंकण्याची संधी निर्माण करून दिली होती.

संभाव्य संघ-

पंजाब – रवीचंद्रन अश्‍विन ( कर्णधार) , मयांक अगरवाल, हर्षदीप सिंग, मुरुगन अश्‍विन, अग्नेवेश आयाची,सॅम करन, ख्रिस गेल, मोईसे हेन्‍रीक्‍स, सर्फराज खान, मनदीप सिंग, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी, मुजीब अर रेहमान, करुण नायर, दर्शन नळकांडे, निकोलस पुरन, लोकेश राहुल, अंकित राजपूत, सिमरन सिंग, अँड्राइव टाय, वरुण चक्रवर्थी, हार्डस विलजोईन.

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, बेन कटिंग, क्विंटम डी कॉक, अलझारी जोसेफ, ईशान किशन, पंकज जयस्वाल, सिद्देश लाड, इविन लुईस, मिचेल मॅकलाघन, लसिथ मलिंगा, मयांक मार्कंडे, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, किएरॉन पोलार्ड, रसिख सलाम, अंकुल रॉय, बरिंदर सरन, आदित्य तारे, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)