व्याजदर कपातीची शक्‍यता वाढली

मुंबई – रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी सरकारी बॅंकाच्या मुख्याधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. एनपीए कमी करण्यासाठी काही बॅंकांनी चांगले प्रयत्न केले आहेत. त्यातील काही बॅंकांचा नफा पुढील तिमाहीपासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. यावर यावेळी चर्चा झाली.

7 फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या पतधोरणात बॅंक व्याजदरात कपात करील, त्याचबरोबर आगामी काळातही धोरण कडक राहणार नसल्याचे बॅंक सांगण्याची शक्‍यता आता गृहीत धरली जाऊ लागली आहे. कारण किरकोळ आणि घाऊक महागाई कमी आहे त्याचबरोबर ती वाढण्याची शक्‍यता कमी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)