इन्फोसिस कंपनीकडून 8260 कोटींचे बायबॅक

नवी दिल्ली – इन्फोसिस कंपनीने आज आपला ताळेबंद जाहीर केला. कंपनीने 8260 कोटी रुपयांच्या शेअरची फेरखरेदी करण्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर कंपनीने प्रती शेअर 4 रुपयाचा विषेश लाभांश जाहीर केला आहे.

कंपनीने सांगितले की, कंपनीने ठरविल्याप्रमाणे गेल्या वर्षापासून भागधारकांना 13 हजार कोटी रुपयाचा लाभ दिला आहे.
त्याचबरोबर संचालक मंडळाने किरण मुजुमदार यांची संचालक मंडळाने फेरनियुक्ती केली आहे. कंपनीने सांगीतले की, फेरखरेदीसाठीचा दर प्रती शेअरला 800 रुपयापेक्षा जास्त असणार नाही. कंपनीने 2017 मध्ये 13 हजार कोटी रुपयाची शेअरची फेरखरेदी केली होती. आता फरेखरेदीसाठी कंपनीने एका समितीची नियुक्‍ती केली आहे. याचा तपशील आगामी काळात जाहीर करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इन्फोसिस कंपनीने आज जाहीर केलेल्या ताळेबंदात तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 30 टक्‍क्‍यांनी कमी होऊन तो आता 3610 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत 5219 कोटी रुपयांचा नफा मिळविला होता. आगामी काळाबाबत कंपनी आशावादी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)