सिंधू, श्रीकांत आणि साई प्रनिथ यांची आगेकूच

नवी दिल्ली  -भारतीय संघाची अव्वल महिला खेळाडू पी. व्ही. सिंधू, किदंबी श्रीकांत, पारुपल्ली कश्‍यप आणि बी साई प्रणिथ यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करत येथे होत असलेल्या ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेत आगेकूच नोंदवली आहे.

पी. व्ही. सिंधूने मुग्धा आग्रेचा 21-8, 21-13 असा सहज पराभव करत आगेकूच नोंदवली. यावेळी सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून सिंधूने मुग्धावर वर्चस्व गाजवताना मुग्धावर दबाव आणला. त्यामुळे मुग्धाला सामन्यात पुनरागमन करण्यात अपयश आले.

तर, बी साई प्रणिथने कार्तिकेय गुलशन कुमारचा संघर्षपूर्ण पराभव करत आगेकूच केली. यावेळी साई प्रणिथने पहिला सेट 22-24 अशा फरकाने गमावल्यानंतर पुनरागमन करत दुसरा सेट 21-13 अशा फरकाने आपल्या नावे केला तर तिसऱ्या सेटमध्ये त्याने कार्तिकेयला प्रतिकाराची एकही संधी न मिळू देता तो सेट 21-8 अशा फरकाने जिंकत आगेकूच केली.
तर, किदंबी श्रीकांत आणि वॉंगविंग की विन्सेन्टचा संघर्षपूर्ण पराभव करत आगेकूच केली. यावेळी सामन्याचा पहिला सेट श्रीकांतने 21-16 अशा फरकाने आपल्या नावे केला होता.

मात्र, दुसरा सेटमधे विन्सेन्टने पुनरागमन करत दुसरा सेट 18-21ने जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. तर, पुन्हा श्रीकांतने पुनरागमन करत तिसरा सेट 21-19 अशा फरकाने आपल्या नावे केला. तर, पारुपल्ली कश्‍यपने लि चेऊक येऊचा 14-21, 21-18, 21-10 असा पराभव करत आगेकूच केली. यावेळी कश्‍यपने पहिला सेट गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत लिवर दबाव आणला त्यामुळी लिने दुसरा सेट 21-18 असा गमावला तर कश्‍यपने तिसऱ्या सेटमध्ये लिवर जोरदार आक्रमण करत त्याला प्रत्युत्तराची कोणतीही संधी न मिळू देता तिसरा सेट 21-10 अशा फरकाने आपल्या नावे केला. तर, शुभंकर डेने चौथे मानांकन असलेल्या टॉमी सुगिराटोचा 14-21, 22-20, 21-11 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)