रुपया बळकट झाल्यामुळे निर्यातदारांना चिंता

नवी दिल्ली -गेल्या एक महिन्यापासून रुपयाचे मूल्य वेगात वाढले आहे. त्यामुळे निर्यातीवर परिणाम होत आहे, असे निर्यातदार संघटनांच्या संघाने म्हटले आहे. सध्या रुपयाचे मूल्य 7 महिन्यांच्या उच्चांकावर आहे.

एकेकाळी एका डॉलरला 75 रुपये लागत होते. आता एका डॉलरला केवळ 68.53 रुपये लागत आहेत. त्यामुळे भारताची निर्यात आंतरराष्ट्रीय बाजारात महाग होत असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष गणेश गुप्ता यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, रुपयाच्या मूल्यात एखाद्या विशिष्ट पातळीवर स्थिरता येण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसून येत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रुपयाचे मूल्य आवश्‍यकतेपेक्षा जास्त असल्यास जागतिक बाजारात भारतीय वस्तूंचे दर वाढतात. त्यामुळे इतर देशांच्या वस्तूंच्या किमतीच्या तुलनेत भारतीय वस्तूच्या किमती जास्त भासतात. या कारणामुळे आयातदार भारतीय वस्तूंकडे दुर्लक्ष करू लागले आहेत, असे या संघटनेने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)