सरलेल्या वर्षात 311 दहशतवादी ठार

file photo

काश्‍मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेला मोठे यश

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरमध्ये 2018 हे वर्ष दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. लष्कराने यंदा 311 दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराचे अधिकारी लेफ्टनंट कमांडर जनरल अनिल कुमार भट्ट यांनी ही माहिती दिली. काश्‍मीर खोऱ्यात मिळालेल्या या यशाचे श्रेय त्यांनी सुरक्षा दलांमधील समन्वय आणि कारवाईसाठी मिळालेल्या स्वातंत्र्याला दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्‍मिरात यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक हल्ले केले. या दहशतवाद्यांना स्थानिकांचाही पाठिंबा मिळत असल्याचे समोर आले असून ही चिंतेची बाब आहे. दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू असताना जवानांवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या.

स्थानिकांचा दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे खोऱ्यात स्थानिक दहशतवाद्यांच्या भरतीतही वाढ झाली आहे. हिज्बुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटना काश्‍मिरी तरुणांना फितवून दहशतवादी कारवायांसाठी वापर करून घेत आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने यंदा 311 दहशतवाद्यांचा खात्मा केला असला तरी अद्यापही काश्‍मीर खोऱ्यात 250 ते 300 दहशतवादी सक्रिय आहेत.

काश्‍मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांनी उच्छाद मांडल्यानंतर लष्कराने ऑपरेशन ऑल आऊट हे मिशन हाती घेतले आणि याद्वारे 2018 मध्ये 311 दहशतवाद्यांची सफाई करण्यात आली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा या आकडेवारीमध्ये तब्बल 90 ने वाढ झाल्याचे दिसत आहे. 2017 मध्ये लष्कराने 232 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

2018 मध्ये दहशतवादी कारवायांमध्येही वाढ झाली आहे. काश्‍मीर खोऱ्यात गेल्या वर्षी 342 दहशतवादी घटना घडल्या होत्या, तर 2018 च्या डिसेंबरपर्यंत 429 दहशतवादी घटना घडल्या. या दहशतवादी घटनांमध्ये 77 नागरिक ठार तर 80 जवान शहीद झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)