व्होडाफोन-आयडिया मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी करणार

नवी दिल्ली – जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन -आयडिया 25 हजार कोटी रुपयाचा फंड जमविण्याच्या तयारीत आहे. कंपनी त्यासाठी राईट्‌स इश्‍यूच्या माध्यमातून या फंडाची उभारणी करणार असल्याची माहिती दिली आहे.

याच्यासाठी कंपनी बोर्डाकडून मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रमोटर शेअरधारक व्होडाफोन ग्रुपने 11 हजार कोटी आणि आदित्य बिर्ला ग्रुपने राईट्‌स इश्‍यूच्या माध्यमातून 7 हजार 250 कोटी रुपयांपर्यंत योगदान देणार असल्याचे शेअर बाजारात सादर करण्यात आलेल्या फायलिंगच्या आधारे स्पष्टीकरण दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रमोटर शेअरधारकांनी सांगितले आहे की फक्त राईट्‌स इश्‍यूचा पूर्ण उपयोग नोंदणी करण्यासाठी होणार नसल्यास त्यांच्या जवळ अधिकार देण्यासाठीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. की बचत करण्यात आलेल्या हिस्सेदारीची खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी कंपनी बोर्डाकडून निधी जमा करण्याचा व त्याबद्दलचे नियम आणि अटी तयार करण्यासाठीचे अधिकार दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)